माणसाच्या दुनिया
माणसाच्या दुनियेत
सावधच बरं आहे
प्रत्येकाला वाटतं इथं
माझ तेच खरं आहे
वाटनं आणि असनं यात
खुप मोठा फरक आहे
समोरच्याकडून तरीसुद्धा
खोट आपण ठरत आहे
त्रास होईल असे मात्र
प्रत्येक जण लागत आहे
टोचून बोलून आनंदात
ते मात्र जगत आहे
जास्त काळजी कधी कधी
त्रासदायक ठरत आहे
आपल्याला नको असते
तेच नेमक घडत आहे
कितीही सावध वागल तरी
फासले उलटे पडत आहे
निस्वार्थी पणे जगूनही
स्वार्थी आपण ठरत आहे
माणसाच्या दुनियेत
सावधच बरं आहे
कोणाला काही वाटल तरी
मन आपल खरं आहे
Comments
Post a Comment