Posts

Showing posts from July, 2020

आयुष्यातील एक निर्णय

आयुष्यात एक निर्णय  कधी तरी घ्यावा लागेल कितीही चुकलो रहता तरी जीवन मात्र जगावं लागेल एखादा विषय कधीतरी आयुष्यातून संपवावा लागेल मनापासून रडून एकदा पुढे मात्र जावं लागेल आपलं कोण अनं परकं कोण यांचा शोध घ्यावा लागेल जगत असतील तुझ्यासाठी वेळ त्यांना ही द्यावा लागेल दु:ख असतातच प्रत्येकाला तुझ मात्र विसराव लागेल एखाद्याच्या आनंदात सुख तुलाही पाहाव लागेल जवळच्या मेलेल्या व्यक्तीलाही कधी ना की जाळाव लागेल कितीही नाही म्हटल तरी वळण आल्यावर वळाव लागेल आयुष्यात एक निर्णय  कधी तरी घ्यावा लागेल सुख मिळो की दु:ख मिळो सोबती त्यांच्या राहाव लागेल

माणसाच्या दुनिया

माणसाच्या दुनियेत सावधच बरं आहे प्रत्येकाला वाटतं इथं माझ तेच खरं आहे वाटनं आणि असनं यात खुप मोठा फरक आहे  समोरच्याकडून तरीसुद्धा खोट आपण ठरत आहे त्रास होईल असे मात्र प्रत्येक जण लागत आहे टोचून बोलून आनंदात  ते मात्र जगत आहे जास्त काळजी कधी कधी त्रासदायक ठरत आहे आपल्याला नको असते तेच नेमक घडत आहे कितीही सावध वागल तरी फासले उलटे पडत आहे निस्वार्थी पणे जगूनही स्वार्थी आपण ठरत आहे माणसाच्या दुनियेत सावधच बरं आहे कोणाला काही वाटल तरी मन आपल खरं आहे