आयुष्यातील एक निर्णय

आयुष्यात एक निर्णय 
कधी तरी घ्यावा लागेल
कितीही चुकलो रहता तरी
जीवन मात्र जगावं लागेल

एखादा विषय कधीतरी
आयुष्यातून संपवावा लागेल
मनापासून रडून एकदा
पुढे मात्र जावं लागेल

आपलं कोण अनं परकं कोण
यांचा शोध घ्यावा लागेल
जगत असतील तुझ्यासाठी
वेळ त्यांना ही द्यावा लागेल

दु:ख असतातच प्रत्येकाला
तुझ मात्र विसराव लागेल
एखाद्याच्या आनंदात
सुख तुलाही पाहाव लागेल

जवळच्या मेलेल्या व्यक्तीलाही
कधी ना की जाळाव लागेल
कितीही नाही म्हटल तरी
वळण आल्यावर वळाव लागेल

आयुष्यात एक निर्णय 
कधी तरी घ्यावा लागेल
सुख मिळो की दु:ख मिळो
सोबती त्यांच्या राहाव लागेल

Comments